उमराळे, कोचरगाव गटाची आढावा बैठक
By Admin | Updated: July 14, 2017 00:40 IST2017-07-14T00:14:02+5:302017-07-14T00:40:18+5:30
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु. व कोचरगाव जि. प. गटाची आढावा बैठक दि. १४ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे

उमराळे, कोचरगाव गटाची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु. व कोचरगाव जि. प. गटाची आढावा बैठक दि. १४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.माजी आमदार रामदास चारोस्कर , कोचरगाव गटाचे जि. प. सदस्य अशोकराव टोंगारे, दिंडोरी पंचायत समीतीचे सभापती एकनाथ गायकवाड, उपसभापती वसंतराव थेटे, मडकीजांब गणाचे सदस्य कैलास पाटील, उमराळे बु. गणाच्या प. स सदस्या विनता अपसुंदे, ननाशी गणाचे सदस्य हिरामण महाले यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.यावेळी शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, समाजकल्याण, इंधन दळणवळण तसेच इतर विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे. उमराळे बु. व कोचरगाव गटातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी यांनी आपल्या गावातील प्रश्न, समस्या, अडचणी, निवेदनांसह उपस्थित राहावे, असे आवाहन उपसभापती वसंतराव थेटे यांनी केले आहे.