मालेगावा मनपात कोरोनाबाबत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:17 PM2020-03-29T18:17:33+5:302020-03-29T18:18:39+5:30

मालेगाव : महानगरपालिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर ताहेरा रशीद शेख व आयुक्त किशोर बोर्डे यांनी संयुक्तरित्या यांनी कोरोना साथजन्य आजाराशी ...

Review meeting on the Malegawa Manpat Corona | मालेगावा मनपात कोरोनाबाबत आढावा बैठक

मालेगावा मनपात कोरोनाबाबत आढावा बैठक

Next

मालेगाव : महानगरपालिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर ताहेरा रशीद शेख व आयुक्त किशोर बोर्डे यांनी संयुक्तरित्या यांनी कोरोना साथजन्य आजाराशी युद्धपातळीवर लढण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन याबाबत खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर शहरातील नागरिकांना माहिती देण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शासनाच्या निर्देशानुसार आपत्कालीन स्थितीत आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
आयुक्त बोर्ड यांनी सांगितले की अनावश्यक गर्दी टाळणे, शाळा कॉलेज बंद ठेवणे, पुढील काही दिवस काळजी घेण्याचे आदेश आहेत.त्यानुसार यापूर्वीच महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा स्थिगत करण्यात येत आहे. तसेच महापालिकेत शिष्टमंडळ यांना प्रवेश तात्पुरत्या स्वरूपात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रद्द करण्यात येत आहेत असे महापौर व आयुक्त यांनी संयुक्तरीत्या सांगितले. आजपर्यंत शहरात एकही कोरोना पाँझििटव्ह रु ग्ण नाही ही सुदैवाची बाब आहे. उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले की महापालिकेमार्फत मदनी नगर व सोयगाव येथे प्रत्येकी २० बेडची व मनपाच्या मालधे येथील रिकाम्या २ आयएचएसडीपी इमारतीमध्ये २०० बेडची क्वारंटाईन व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Review meeting on the Malegawa Manpat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.