शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

औद्योगिक वसाहतींसाठी आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:41 AM

मालेगाव : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करून औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन तसेच स्थानिकांना प्राधान्य देणे याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. याबाबत शासन सकारात्मक असून, यातून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

ठळक मुद्देदादा भुसे : तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

मालेगाव : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करून औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन तसेच स्थानिकांना प्राधान्य देणे याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. याबाबत शासन सकारात्मक असून, यातून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अजंग - रावळगाव औद्योगिक वसाहतीचे इंटिग्रेटेड टेक्सटाइल हब या योजनेत समावेश करून उद्योजकांसाठी कामगार वसाहत, दवाखाना, शाळा, फळे व भाज्या प्रक्रि या प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन, पाणीपुरवठा व इतर बाबींसाठी जागा राखून ठेवण्यात यावी. समांतर भूखंडाची प्रक्रिया सुरू करून स्थानिकांना तसेच महिला उद्योजक, अपंग, बचतगट, शेतकरी यांना प्राधान्य देण्यात यावे. त्याचबरोबर गिरणा धरणावरून चाळीसगाव फाटा येथे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करण्यात यावी. तसेच निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत उद्योग सुरू करण्याºया उद्योजकांना अतिरिक्त सवलत देण्यात यावी, असे प्रस्ताव ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सादर केले. या उद्योगांसाठी आवश्यक वीज व पाणी याबाबत माहिती स्थानिक लोकांनी उपलब्ध करून दिली असल्याचेही भुसे यांनी सांगितले.औद्योगिक वसाहतीबाबत लवकरच निर्णयउद्योगमंत्री देसाई म्हणाले, लघुउद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आधुनिक तंत्रज्ञान व आर्टिफिशिअल इंटलिजन्स-सारख्या तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळ कमी लागते. त्यामुळे यावर उपाय म्हणून लघुउद्योगांना चालना देणे आवश्यक असून, अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतींबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.