कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 15:52 IST2020-04-22T15:52:31+5:302020-04-22T15:52:47+5:30

ओझर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग पाळत आढावा बैठक घेतली.

 Review meeting on the background of the corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

ओझर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग पाळत आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार दीपक पाटील, पंचायत समितीचे गटविकास संदीप कराड यांच्यासह निफाडचे शिवसेना नेते अनिल कुंदे, राजाभाऊ शेलार, संजय कुंदे, गोकुळ गीते आदी उपस्थित होते. कदम यांनी निफाड तालुक्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला.पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्यावतीने सुरू असलेल्या जनजागृतीबाबत गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी यावेळी माहिती दिली. पठारे व पाटील यांनी तालुक्यातील लोकांना शासनाच्यावतीने देन्यात येणार्या धान्य वाटपाची सविस्तर माहिती दिली. यावेळी बैठकीस नंदू कापसे, दीपक गाजरे, खंडू बोडके आदी उपस्थित होते.

Web Title:  Review meeting on the background of the corona

टॅग्स :Nashikनाशिक