बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावी सुविधांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST2021-07-20T04:11:42+5:302021-07-20T04:11:42+5:30
बकरी ईद काळात संपूर्ण शहरात चार दिवस नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात यावा, कुर्बानीनंतर निर्माण होणारी घाण, मांस, ...

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावी सुविधांचा आढावा
बकरी ईद काळात संपूर्ण शहरात चार दिवस नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात यावा, कुर्बानीनंतर निर्माण होणारी घाण, मांस, कचरा इतरत्र न टाकता महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणी वाहनांमध्ये जमा करावा, स्वच्छता व वाहन विभागाने रस्त्याने मांस घेऊन जात असताना योग्य ती दक्षता घ्यावी, मलेरिया विभागाने दैनंदिन सणाच्या कालावधीत वेळोवेळी फवारणी करावी, विद्युत विभागाने सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक पथदीप सुस्थितीत सुरू ठेवावे. तसेच शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत, पावसाचे दिवस असल्याने धोकादायक इमारती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील सर्व धोकादायक इमारती धारकांना नोटिसा देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर शेख यांनी बैठकीत दिले.
बैठकीस माजी महापौर रशीद शेख, सभागृह नेते असलम अन्सारी, प्रभाग क्र ३ चे सभापती अब्दुल अजीज अब्दुल सत्तार यांच्यासह आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त राहुल पाटील, लेखाधिकारी राजू खैरणार, सहायक आयुक्त (कर) तुषार आहेर, सहायक आयुक्त वैभव लोंढे, सहायक आयुक्त (स्वच्छता) अनिल पारखे, शहर अभियंता कैलास बच्छाव, विद्युत अधीक्षक अभिजीत पवार, अग्निशमन अधीक्षक संजय पवार, उपअभियंता जयपाल त्रिभुवन, उपअभियंता सचिव माळवाळ, उपअभियंता शांताराम चौरे, नगररचनाकार संजय जाधव, प्रमुख स्वच्छता निरीक्षक अमित सौदे, आस्थापना पर्यवेक्षक तौसीफ शेख, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, सचिन महाले, स्वच्छता निरीक्षक आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.