दिंडोरीत फलोत्पादन योजनांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:48 IST2020-12-16T19:05:41+5:302020-12-17T00:48:17+5:30
जानोरी : कृषी विभागाच्या फलोत्पादनविषयक सर्व योजनांचा आढावा घेण्यासाठी संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिंडोरी तालुक्यास भेट दिली.

दिंडोरीत फलोत्पादन योजनांचा आढावा
यावेळी मोते यांनी संदीप सोमवंशी, सुशीला वडजे, मडकिजांब यांचे पेरू बागेस भेट दिली. अलका बोराडे यांचे पॉलिहाऊस व नर्सरीला भेट दिली. मडकीजांब येथील शेतकऱ्यांशी शेडनेट व पॉलिहाऊस बांधणीविषयी चर्चा केली. मॉडेलमध्ये करावयाच्या सुधारणांबाबत शेतकऱ्यांबरोबरदेखील चर्चा करण्यात आली. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी मोहाडी येथे भेट दिली. दौऱ्यावेळी शिरसाठ, उपसंचालक कृषी, खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी, अभिजीत जमधडे, पवार, मंडळ कृषी अधिकारी ठोके, कृषी पर्यवेक्षक, विमा प्रतिनिधी अमोल जाधव, कृषी सहायक गावित उपस्थित होते.