दर सहा महिन्यांनी घेणार विभागीय कामकाजाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:42 IST2020-01-31T00:06:57+5:302020-01-31T00:42:57+5:30
नाशिक : राज्यातील जनतेच्या सरकारकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे प्रश्न आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विभागीय ...

दर सहा महिन्यांनी घेणार विभागीय कामकाजाचा आढावा
नाशिक : राज्यातील जनतेच्या सरकारकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे प्रश्न आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विभागात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याबरोबर अशा आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामकाजाचा आढावा दर तीन ते सहा महिन्यांनी घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्टÑातील पाचही जिल्ह्णांची आढावा बैठक पार पडली. विभागीय बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विभागीय बैठकीचा उद्देश सांगतांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आढावा घेणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच बैठक होती. या बैठकीमध्ये नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्णातील आमदार तसेच तेरा विविध शासकीय विभागांचे सचिव, अपर सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवरही साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
लोकप्रतिनिधींचे प्रश्न थेट सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. काही महत्त्वाचे निर्णय या बैठकांमध्ये झाल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठका घेणे आवश्यक असून, दर तीन ते सहा महिन्यांनी आढावा घेईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीमध्ये उत्तर महाराष्टÑातील रखडलेले प्रकल्प, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा यासह अनेक प्रश्न जाणून घेण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेण्यात आली तर काही प्रश्न लागलीच प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा झाली. काही रखडलेल्या प्रकल्पांवर मार्ग काढण्यात आला. काही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.