शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

दाभाडी क्लस्टर कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 1:15 AM

नाशिक : दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना भूमिगत गटार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देऊन सदरची कामे पूर्ण करावीत; तसेच यासाठी ग्रामविकास आराखड्यातील घेतलेल्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून तपासणी

 

 

 

नाशिक : दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना भूमिगत गटार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देऊन सदरची कामे पूर्ण करावीत; तसेच यासाठी ग्रामविकास आराखड्यातील घेतलेल्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात दाभाडी क्लस्टरमधील विकासकामांबाबत आढावा बैठक झाली. त्यात दाभाडी क्लस्टर अंतर्गत गावात राबविण्यात येणाºया पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पथदीप, जनसुविधा अंतर्गत प्रस्तावित कामे, जलयुक्त शिवार, आरोग्य, शिक्षण कृषीविकासाच्या योजना, कौशल्य विकास, घरकुल या योजनांचा आढावा घेण्यात आला.यावेळी गिते म्हणाले, या अभियानाची अंमलबजावणी करताना भूमिगत गटार, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांना अधिक प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामविकास आराखड्यातील सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच भूमिगत गटार यासाठी सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण भागातील गावांच्या समूहाचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवणे हा श्यामाप्रसाद मुखर्जी अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत जिल्ह्णात मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमधील आठ गावांचा समावेश आहे. या अभियानातून दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, जळगाव, बेळगाव, तळवाडे, पांढरून, धवळेश्वर या आठ गावांचा विकास करण्यात येत आहे.