शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

त्र्यंबकेश्वर जमीन घोटाळ्यात महसुल अधिकारी, बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 2:17 PM

त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन प्रांत रामसिंग सुलाने, तहसिलदार रविंद्र भारदे, मंडळ अधिकारी नंदकिशोर बिरारी व तलाठी बी. एम. हांडोरे यांचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिया देवस्थान व गंगाद्वार ट्रस्टच्या मालकिच्या सुमारे १८५ एकर इनामी जमिनीवरील कुळ शासन व धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता बदलले गेले

ठळक मुद्देत्र्यंबक देवस्थान : गुन्हा दाखल होताच संशयित फरार मुळ वहिवाटीदार प्रभाकर शंकर महाजन यांनाही आरोपी करण्यात आले

नाशिक : देवस्थान जमिनीवर कुळ लावण्याची तरतूद नसतानाही कुळाची नोंद करून त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिया देवस्थानाची सुमारे दोनशे कोटी रूपयांची जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिकाला विक्री केल्या प्रकरणी अखेर त्र्यंबक पोलीसात तत्कालीन तहसिलदार, प्रांत अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी या महसुल खात्याच्या अधिका-यांसह बांधकाम व्यावसायिक सचिन दप्तरे व अन्य अशा २२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जमीन घोटाळ्यात गुन्हा दाखल होण्याच्या शक्यतेने संंबंधित सर्वच संशयित फरार झाले आहेत.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन प्रांत रामसिंग सुलाने, तहसिलदार रविंद्र भारदे, मंडळ अधिकारी नंदकिशोर बिरारी व तलाठी बी. एम. हांडोरे यांचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिया देवस्थान व गंगाद्वार ट्रस्टच्या मालकिच्या सुमारे १८५ एकर इनामी जमिनीवरील कुळ शासन व धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता बदलले गेले व महसुल अधिका-यांनी बांधकाम व्यावसायिक सचिन दिनकर दप्तरी यांचे नाव सातबारा उता-यावर कुळ म्हणून लावले. या संदर्भात शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपिस्थित केल्यावर त्याचे उत्तर देताना कागदपत्र तपासणीतून विभागाीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास ही बाब आली. देवस्थानची जमीन धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विक्री करता येत नाही तसेच शासनाने संबंधित देवस्थानाला सदरची जमीन इनाम म्हणून दिलेली असताना त्यावर कुळाचे नाव लावता येत नसतानाही देवस्थानाने जमीनीची परस्पर बेकायदेशीर विक्री केल्याने संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश झगडे यांनी जिल्हाधिका-यांना दिले होते. त्यावर जिल्हाप्रशासनाने टाळाटाळ चालविली होती. परंतु अधिवेशनाच्या तोंडावर हा मुद्दा उपस्थित झाल्याने अखेर शनिवारी रात्री उशिरा त्र्यंबकेश्वरचे नायब तहसिलदार एस. एम. निरगुडे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे. यात देवस्थानचे मुळ वहिवाटीदार प्रभाकर शंकर महाजन यांनाही आरोपी करण्यात आले आहे.कोट्यवधी रूपयांची देवस्थान जमीनीच्या या घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासुन चर्चा होत असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे शनिवारी गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी फरार झाले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाNashikनाशिक