मालेगाव तहसील कार्यालयात महसूल दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:56 IST2020-08-04T22:14:44+5:302020-08-05T00:56:01+5:30
मालेगाव : येथील तहसील कार्यालयात राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून, हा कणा अधिक मजबूत बनविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गतीने काम करण्याची गरज आहे. शासकीय योजना गरीब जनतेपर्यंत पोहोचवून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा, असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले.

मालेगाव तहसील कार्यालयात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उत्कृष्ट तलाठी पुरस्कार स्वीकारताना अजंग सजेच्या तलाठी सुप्रिया जाधव. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदी.
मालेगाव : येथील तहसील कार्यालयात राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून, हा कणा अधिक मजबूत बनविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गतीने काम करण्याची गरज आहे. शासकीय योजना गरीब जनतेपर्यंत पोहोचवून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा, असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले. यावेळी नाशिक जिल्हा उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने अजंग सजेच्या तलाठी सुप्रिया जाधव यांना सन्मानित करण्यात आले. कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते जाधव यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.