शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दुचाकी चोरांचा सुळसुळाट ; एकाच दिवसात पाच घटना उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:58 IST

नाशिक शहराच्या विविध भागातून पाच मोटार सायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व  पंटवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण  पाच  दुचाकी वेगवेगळ््या दिवशी चोरीला गेल्या असून गुरुवारी (दि.१४) या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देनाशिक शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाटपोलिस विभागाला दुचाकी चोरांचे आव्हान दिवसेंदिवस वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ

नाशिक :  शहराच्या विविध भागातून पाच मोटार सायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व  पंटवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण  पाच  दुचाकी वेगवेगळ््या दिवशी चोरीला गेल्या असून गुरुवारी (दि.१४) या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरांचा सुळसुळाट वाढला असून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेसमोर आव्हाण उभे केले आहे. पंचवटीतील पेठफाटा  परिसरातील म्हाडा इमारतीच्या पार्कींगममधून बुधवारी (दि.१३) साडेनऊ वाजेपासून ते गुरुवारी सात वाजेपर्यंतच्या काळात अंदाजे १४ हजार रुपये किंमतीची मोपेड दुचाकी क्रमांक एमएच १५ सीयू १३१९ चोरीला गेली. याप्रकरणी  दिलीप पुंडलीक चौधरी यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्याच चोरीच्या गुन्ह्याची  नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानकाच्या पार्कींगमध्ये घडली, येथून एमएच१५ डीए २५७६ क्रमांकाची काळ््या रंगाची मोटार सायकल चोरीला गेल्याची फिर्याद कुणाल चंद्रकांत उबाळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना अशोका मार्ग परिसरात स्वरा डेंटल क्लिनिकजवळ घडली. येथे.  सोमवारी (दि.११) सायंकाळी सहा ते  मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी  एमएच१५ जीक्यू०४१६ क्रमांकाची ६० हजार रुपये किंमतीची मोपेड दुचारी चोरून नेली. याप्रकरणी योगेश अंबादास शेलार यांनी  मुंबई नाका पोलीस ठाण्यात   दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर   अंबड परिसरता दोन मोटार सायकली चोरीला गेल्या असून मंगळवारी (दि.१२) मोरवाडीतील दत्तमंदीराजवळून एमएच१५ एएल ४३३७ क्रमांक ाची व  दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी सुनील तुकाराम कातकाडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरी घटना सिडकोच्या त्रीमूर्ती चौक परिसरातील दुर्गामाता मंदीरामागील बाजूस घडली. येथे एमएच१५ ईयू १९९१ क्रमांकाची   १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सुरज शिवदास शिरसाठ यांनी फिर्याद दिली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोर