कालिदासमध्ये नाट्यसंस्थेचे अडकलेले भाडे परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:45+5:302021-07-30T04:14:45+5:30
नाशिकमधील नाट्य संस्था आणि कलावंतांच्या अडचणींबाबत बुधवारी (दि.२८) खोपकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.२९) आयुक्तांना भेटण्याचे ठरले ...

कालिदासमध्ये नाट्यसंस्थेचे अडकलेले भाडे परत करा
नाशिकमधील नाट्य संस्था आणि कलावंतांच्या अडचणींबाबत बुधवारी (दि.२८) खोपकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.२९) आयुक्तांना भेटण्याचे ठरले होते, त्यानुसार भेट घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाच्या अगोदर नाशिकमध्ये अनेक नाट्य संस्थांनी नाटके बुक केली होती. मात्र, नंतर ती रद्द करावी लागली. त्याचे रिफंड अद्याप झालेले नाही. कालिदास कला मंदिराचे नूतनीकरण झाल्यानंतर महापालिकेने नवीन नियमावली तयार केली, ती जाचक असल्याने त्यात काही बदल करण्याचे ठरले होते. मात्र, अनेक बदल झालेले नाहीत. याशिवाय वेळेच्या बाबतीतदेखील अडवणूक केली जाते. विशेषत: बाहेरगावाची नाट्यसंस्था किंवा कलावंत विलंबाने आल्यास नाटके संपण्यास दहा, पंधरा मिनिटे उशीर झाला तरी दोन दोन हजार रुपये दंड आकारले जात आहेत, अशा अनेक तक्रारी करताना कालिदासचे बाळासाहेब गीते हे कर्मचाऱ्यांना अत्यंत अवमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारीदेखील यावेळी करण्यात आल्या.
आयुक्त कैलास जाधव यांनी कलावंतांना रिफंड करण्याचा निर्णय त्वरित सोडवण्यात येईल, असे सांगितले. मात्र, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या अखत्यारीत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विनोद राठोड आणि अन्य कलावंत उपस्थित होते.