मुद्देमाल मूळ मालकांना परत

By Admin | Updated: October 23, 2016 00:02 IST2016-10-23T00:00:42+5:302016-10-23T00:02:24+5:30

मुद्देमाल मूळ मालकांना परत

Return to original owners | मुद्देमाल मूळ मालकांना परत

मुद्देमाल मूळ मालकांना परत

नाशिक : कायदा व सुव्यवस्थेसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या पोलिसांवर आरोप-प्रत्यारोप झाले तरी ते कर्तव्यात कसूर करीत नाहीत़ नागरिक व पोलिसांमधील दरी कमी व्हावी यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे़ या घटकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंघल यांनी केले़ पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल परत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते़
पोलीस मुख्यालयातील ग्रीन बॅरेकमध्ये आयोजित कार्यक्रमात आयुक्त सिंघल यांच्या हस्ते सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना (फिर्यादींना) परत करण्यात आला़ यामध्ये सोने, चांदीच्या ऐवजासह दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने तसेच गृहोपयोगी वस्तूंचा समावेश होता़ पोलीस आयुक्तालयात झालेल्या घरफोडी, चेनस्नॅचिंग, चोरी, जबरी लूट अशा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या मुद्देमालाचा यामध्ये समावेश होता़ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेला हा मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने परत करण्यात आला़
आयुक्तांच्या हस्ते फिर्यादी स्नेहल लाखलगावकर, प्रकाश सोनवणे, लता शिंदे, सुनंदा काळे, सोनल कलंत्री, सुरेखा जोशी, अलका बेलगावकर, शांताराम घरटे, राकेशकुमार शर्मा, मंगला गवांदे, सुवर्णा जाधव, अशोक कुलकर्णी, कमल फुलफेअर, कैलास दाभाडे, शेखर पवार, संतोष माळी, विष्णू भागवत, प्रल्हाद तोरणे, अजितसिंह राऊत, सोमनाथ शिंदे, पुंडलिक दळवी, उदय साळुंखे, इमा मोद्दीवली मोहमद अन्सारी, मिलिंद मेंदळे, प्रशांत जहागीरदार, भास्कर अहिरे आदिंना मुद्देमाल परत केला़
यावेळी व्यासपीठावर पोलीस उपआयुक्त विजय पाटील, दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, अतुल झेंडे, विजयकुमार चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक उपस्थित होते. आभार सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी मानले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Return to original owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.