सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने घेतली धावत्या रेल्वेपुढे उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST2021-04-13T04:14:04+5:302021-04-13T04:14:04+5:30

----- नाशिकरोड : जयभवानीरोड स्वामी विवेकानंदनगरमध्ये राहणारे एकलहरे येथील रेल्वेच्या इरीन या इंजिनिअरिंग संस्थेचे सेवानिवृत्त अधिष्ठाता ओमप्रकाश मित्तल (७५) ...

Retired railway officer jumped in front of the running train | सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने घेतली धावत्या रेल्वेपुढे उडी

सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने घेतली धावत्या रेल्वेपुढे उडी

-----

नाशिकरोड : जयभवानीरोड स्वामी विवेकानंदनगरमध्ये राहणारे एकलहरे येथील रेल्वेच्या इरीन या इंजिनिअरिंग संस्थेचे सेवानिवृत्त अधिष्ठाता ओमप्रकाश मित्तल (७५) यांनी सोमवारी (दि.१२) सकाळी साडेनऊ वाजता मुंबईकडे जाणाऱ्या विशाखापट्टणम-एलटीटी मंदोदी रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, एकलहरे जवळील गोदावरी पुलाजवळ असलेल्या रेल्वेखांब १९५/२० या ठिकाणी मित्तल यांनी उडी घेतली. ही बाब रेल्वेचालकाच्या लक्षात येताच त्याने रेल्वे थांबविली मात्र तोपर्यंत मित्तल यांचा मृत्यू झाला होता. चालकाने या घटनेची माहिती तात्काळ नाशिकरोड रेल्वे स्थानकावर कळविली. आत्महत्या करणारे मित्तल हे रेल्वेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवरून त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली. मित्तल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Retired railway officer jumped in front of the running train