शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

बॅरिकेडिंगला धडकून सेवानिवृत्त कर्मचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 11:21 PM

पंचवटी : महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या पत्नीला पहाटेच्या वेळी कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना दुचाकी दोरखंडाला अडकून रस्त्यावर घसरल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर रस्त्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देदुचाकी अपघातात मनपा कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या पत्नीला पहाटेच्या वेळी कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना दुचाकी दोरखंडाला अडकून रस्त्यावर घसरल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर रस्त्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.किशोर चव्हाण (५९) रा. स्वरगंगा सोसायटी, आरटीओजवळ, असे अपघातात ठार झालेल्या मनपाच्या सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याची पत्नी राजूबेन चव्हाण (५२) गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन करत सर्वत्र नाकाबंदी बॅरिकेड्स व दोरखंडाने रस्ते बंद करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे महापालिका सेवानिवृत्त स्वच्छता कर्मचारी चव्हाण हा पत्नी राजूबेन हिला कामासाठी दुचाकीवरून (एमएच १५, डीडी ९९३१) रविवार कारंजा गंगावाडीत सोडण्यासाठी पेठरोडने जात असताना शनिमंदिर रस्त्यावर दोरखंड न दिसल्याने दुचाकीला दोरखंड अडकला व दुचाकी घसरली. त्यात पती पत्नी रस्त्यावर घसरले. त्यांना लगेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना किशोर यांचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. या अपघाताबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेAccidentअपघात