Retired personnel killed by barricading | बॅरिकेडिंगला धडकून सेवानिवृत्त कर्मचारी ठार

किशोर चव्हाण

ठळक मुद्देदुचाकी अपघातात मनपा कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या पत्नीला पहाटेच्या वेळी कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना दुचाकी दोरखंडाला अडकून रस्त्यावर घसरल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर रस्त्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
किशोर चव्हाण (५९) रा. स्वरगंगा सोसायटी, आरटीओजवळ, असे अपघातात ठार झालेल्या मनपाच्या सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याची पत्नी राजूबेन चव्हाण (५२) गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन करत सर्वत्र नाकाबंदी बॅरिकेड्स व दोरखंडाने रस्ते बंद करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे महापालिका सेवानिवृत्त स्वच्छता कर्मचारी चव्हाण हा पत्नी राजूबेन हिला कामासाठी दुचाकीवरून (एमएच १५, डीडी ९९३१) रविवार कारंजा गंगावाडीत सोडण्यासाठी पेठरोडने जात असताना शनिमंदिर रस्त्यावर दोरखंड न दिसल्याने दुचाकीला दोरखंड अडकला व दुचाकी घसरली. त्यात पती पत्नी रस्त्यावर घसरले. त्यांना लगेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना किशोर यांचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. या अपघाताबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Retired personnel killed by barricading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.