शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 2:22 AM

निफाड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम झाला असून, जेथे दिवसाला ४०० लिटर दूध संकलन होत होते तेथे सध्या ३०० लिटर दूध संकलन होत असल्याची माहिती तालुक्यातील वनसगाव येथील दूध संकलन केंद्राचे संचालक किरण शिंदे यांनी दिली.

ठळक मुद्देआहार कमी : सहा अंशांपेक्षा कमी तापमानामुळे जनावरांचा जीव धोक्यात

नाशिक : निफाड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम झाला असून, जेथे दिवसाला ४०० लिटर दूध संकलन होत होते तेथे सध्या ३०० लिटर दूध संकलन होत असल्याची माहिती तालुक्यातील वनसगाव येथील दूध संकलन केंद्राचे संचालक किरण शिंदे यांनी दिली.कडाक्याच्या थंडीचा दुभत्या गायींच्या आहारावर परिणाम होतो. दुभत्या गायींना दररोज दिला जाणारा खुराकही गायी पूर्णपणे खात नसल्याचे दिसून येत असल्याने त्याचा दुधावरही परिणाम होतो. थंडीमुळे दुधाच्या फॅट आणि डीग्रीही कमी होते, असे किरण शिंदे यांनी सांगितले. दुधाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दूध संकलनावरही त्याचा परिणाम होतो. वनसगाव परिसरातील दूध संकलन केंद्रावर ब्राह्मणगाव, खानगाव, सारोळे या गावांबरोबरच परिसरातील शेतकरी दूध आणतात. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण कमी झाले आहे. शिंदे यांच्या केंद्रावर दररोज किमान ४०० लिटर दूध संकलन होते. थंडी वाढल्यापासून दूध संकलनात घट झाली असून, त्याचे प्रमाण ३०० लिटरपर्यंत आले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक आपल्या घरात हवे तेवढे गरम कपडे अंगावर घेऊन रात्र काढतात. शेकोटी, गरम पाणी, उबदार कपडे यापासून नागरिक स्वत:चे संरक्षण करत असले तरी मुक्या जनावरांना थंडीपासून बचाव करताना मोठी अडचण निर्माण होत आहे . दिवसा गार वारा, रात्री कडाक्याची थंडी, पहाटे दवबिंदू आणि हिमकण अंगावर घेताना जनावरांचा जीव कासावीस होतो आहे, असे भेंडाळी येथील शेतकरी भाऊसाहेब कमानकर यांनी सांगितले. पत्र्याचे शेड अथवा गवताचा झाप यात १० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात जनावरे तग धरू शकतात. मात्र सलग दहा ते अकरा दिवसांपासून सहा अंशांच्या खाली तापमान असल्याने जनावरांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे, असे कमानकर यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीMilk Supplyदूध पुरवठा