शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

टोसिलीझुमॅबच्या वाटपावरही जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:22 IST

रेमडेसिविरप्रमाणेच टोसिलीझुमॅब हे इंजेक्शनदेखील कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यासाठीचा पर्याय म्हणून वापरात येत होते; मात्र आता त्या इंजेक्शनच्या टोसिलीझुमॅबच्या वाटपावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून, रेमडेसिविरप्रमाणेच नाशिकच्या तीन विभागात समन्यायी पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे रेमडेसिविरच्या धर्तीवर जिल्ह्याच्या तीन विभागांत आवश्यकतेनुसार वाटप

नाशिक : रेमडेसिविरप्रमाणेच टोसिलीझुमॅब हे इंजेक्शनदेखील कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यासाठीचा पर्याय म्हणून वापरात येत होते; मात्र आता त्या इंजेक्शनच्या टोसिलीझुमॅबच्या वाटपावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून, रेमडेसिविरप्रमाणेच नाशिकच्या तीन विभागात समन्यायी पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. टोसिलीझुमॅबच्या मागणीत गत महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्राप्त होणारा टोसिलीझुमॅबच्या इंजेक्शनचा साठा सुयोग्य पात्र रुग्णांना वाटप होण्यासाठी शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेऊन संबंधित जिल्ह्यांतर्गत  वितरण सक्रिय रुग्णसंख्येनुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रेमडेसिविरप्रमाणे नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका आणि नाशिक ग्रामीण अशा तीन भागांमध्ये करण्यात आलेली जिल्ह्याची विभागणी या इंजेक्शनच्या वाटपासाठीही कायम राहणार आहे. ४३ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटपमनपा क्षेत्रात ५५ टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून, एकूण २३ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करायचे होते. ते सर्वच्या सर्व इंजेक्शनचे वाटप करण्यात आले, तर नाशिक ग्रामीण क्षेत्रात एकूण ४० टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून एकूण १८ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करावयाचे होते. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ५ टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून, एकूण ०२ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करायचे होते. त्या सर्व रुग्णांना टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.मनपा क्षेत्रात ५५ टक्के रुग्णजिल्ह्यात सध्या नाशिक मनपा क्षेत्रात सुमारे ५५ टक्के रुग्ण तर ग्रामीण भागात ४० टक्के रुग्ण असून, मालेगाव मनपा क्षेत्रात ५ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे त्यानुसारच टोसिलीझुमॅबच्या वाटपाचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नाशिक मनपाचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि मालेगाव मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांचीदेखील वाटप देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं