रुग्णालयात नातेवाईकांच्या गर्दीवर निर्बंध आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:57+5:302021-09-06T04:18:57+5:30
येवला व निफाड तालुका कोरोना सद्य:स्थिती व उपाययोजना आढावा बैठकप्रसंगी भुजबळ बोलत होते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व ...

रुग्णालयात नातेवाईकांच्या गर्दीवर निर्बंध आणा
येवला व निफाड तालुका कोरोना सद्य:स्थिती व उपाययोजना आढावा बैठकप्रसंगी भुजबळ बोलत होते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृती करून उर्वरित लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
येवला तालुक्यातील काही प्रमाणात वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये याविषयीची जनजागृती होणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाच्या जनजागृतीसाठी फिरते वाहन, दर्शनीफलक तसेच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. गणेशोत्सवकाळात शांततेचा भंग होणार नाही तसेच गर्दी वाढणार नाही यासाठी पोलीस यंत्रणा व नगरपालिका विभाग यांनी सतर्क राहावे. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केल्यास अनावश्यक गर्दी टाळता येणे शक्य आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
इन्फो
विविध प्रकल्पांचा आढावा
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव बाह्यवळण रस्ता व उड्डाणपूल, विंचूर आयुर्वेदिक दवाखाना, पाटोदा आरोग्य केंद्र, निमगाव वाकडा आरोग्य केंद्र, तसेच महालखेडा, सावरगाव, ममदापूर मेळाचा बंधारा कामांचा आढावा घेऊन उर्वरित कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.