पेठ तालुक्यात जनता कर्फ्यूला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST2021-04-18T04:13:55+5:302021-04-18T04:13:55+5:30
मागील वर्षाच्या तुलनेत या वेळी रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ दिवस संपूर्ण तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवार ...

पेठ तालुक्यात जनता कर्फ्यूला प्रतिसाद
मागील वर्षाच्या तुलनेत या वेळी रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ दिवस संपूर्ण तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवार दि. १७ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत केवळ मेडिकल, आरोग्य व दूध सेवा वगळता किराणासह सर्व व्यवहार बंद ठेवल्याने पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिसून आला. तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेले पेठ, करंजाळी, जोगमोडी, कोहोर आदी मोठ्या गावांनी स्वयंस्फूर्तीने १५ दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांची वर्दळ पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाडी-वस्तीवरही स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार नागरिक घरातच थांबले असल्याने संसर्गाची ही चेन नक्कीच खंडित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फोटो - १७ पेठ कर्फ्यू
पेठ शहरातील बलसाड रोडवरील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट
===Photopath===
170421\17nsk_24_17042021_13.jpg
===Caption===
फोटो - १७ पेठ कर्फ्यू पेठ शहरातील बलसाड रोडवरील मुख्य बाजार पेठेत शुकशुकाट