मानसिक स्वास्थ्य विषयावरील कार्यशाळेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 17:12 IST2019-03-02T17:11:30+5:302019-03-02T17:12:55+5:30

देवळा : राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र व ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा येथे मानिसक स्वास्थ्य आणि राजयोग ...

Responding to the workshop on mental health topics | मानसिक स्वास्थ्य विषयावरील कार्यशाळेला प्रतिसाद

कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना डॉ. अर्चना देशपांडे व उपस्थित अधिकारी.

ठळक मुद्दे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक स्वास्थ्य व राजयोग मेडिटेशन या कार्यशाळेचे आयोजन

देवळा : राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र व ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा येथे मानिसक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यान कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत उपस्थितांनी मेडिटेशनद्वारे दैनंदिन जीवनातील धावपळीपासून तणावमुक्तिचा अनुभव घेतला.
देवळा पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत मेडिटेशन वर्कशॉप फॉर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स या उपक्र मातर्गत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक स्वास्थ्य व राजयोग मेडिटेशन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेस आयुषचे सहा. संचालक डॉ. उमेश तागडे प्रमुख मार्गदर्शन होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई आणि ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागाचे डॉ. सचिन परब, ब्रम्हकुमारी दिपमाला, डॉ. सुभाष मांडगे, डी. व्ही. हाके आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा सत्कार कख्यात सूत्रसंचलन बी.के. नंदीनी यांनी केले.
तुलना, चढाओढ, नकारात्मकता, मानसिक स्वास्थ्यासाठी हानीकारक असून ध्यानाभ्यासामुळे दैनंदिन जीवनात सदृढ मानसिक स्वास्थ्य प्राप्त करणे सहज शक्य आहे. प्रशिक्षणामुळे आपण देत असलेल्या सेवेत अधिक निपुणता येते आणि अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा जनतेस दिली जाऊ शकते असे प्रतिपादन डॉ. अर्चना देशपांडे यांनी मार्गदर्शन करतांना केले.
आरोग्य सेवेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्याचे प्रशिक्षण मिळावे आणि मानसिक स्वास्थ्याचे त्यांनी प्रबोधन करावे या उद्देशाने कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेसाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सुभाष मांडगे यांनी आभार मानले.
 

Web Title: Responding to the workshop on mental health topics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Meditationसाधना