शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कुंदेवाडीमार्गे निऱ्हाळे बस सुरू झाल्याने समाधान

By admin | Updated: August 1, 2014 01:12 IST

कुंदेवाडीमार्गे निऱ्हाळे बस सुरू झाल्याने समाधान

 

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे येथे सिन्नर आगाराने कुंदेवाडीमार्गे सिन्नर -निऱ्हाळे बस सुरू केली आहे. सकाळी सात वाजता ही बस सुरू करण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.पोलीस पाटील शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात या पहिल्या बसचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच सुनीता जाधव, उपसरपंच शशिकांत केकाणे, सुभाष यादव, राजेंद्र वाघ, सोपान काकड, विठ्ठल वाघ, प्रकाश दराडे, देवीदास वाघ, शांताराम केकाणे आदि उपस्थित होते. प्रवाशांनी आपल्या दैनंदीन प्रवासात खासगी वाहनाऐवजी महामंडळाच्या बसचा वापर करण्याचे आवाहन पोलीस पाटील शिंदे यांनी यावेळी केले. निऱ्हाळे - खंबाळे - मुसळगाव -कुंदेवाडी हा रस्ता तीन वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात आला आहे. चांगला रस्ता असतानाही यापूर्वी या मार्गावर एकही बस सुरु नव्हती. त्यामुळे यामार्गे सकाळी ७ वाजता एक बस सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन सिन्नर आगार व्यवस्थापक दिलीप जाधव यांनी ही बस सुरु केली आहे. यामुळे निऱ्हाळे, फत्तेपूर, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, सुरेगाव, गुलापूर, खंबाळे, दातली, मुसळगाव, कुंदेवाडी आदि गावांतील विद्यार्थी व कामगार प्रवाशी वर्गाची गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)