शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नांदगावी एक कोटी सूर्यनमस्कारांची संकल्पपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:30 PM

नांदगाव- नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेला ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ या उपक्र मांतर्गत विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्र माची मागील वर्षी याच दिवशी सुरू झालेल्या उपक्र माचा संकल्पपूर्ती सोहळा २४ जानेवारीला संपन्न झाला.

नांदगाव- नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेला ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ या उपक्र मांतर्गत विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्र माची मागील वर्षी याच दिवशी सुरू झालेल्या उपक्र माचा संकल्पपूर्ती सोहळा २४ जानेवारीला संपन्न झाला.यात नांदगाव संकुलातील व्ही.जे.हायस्कूल,नांदगाव, मि. भि. छाजेड विद्यामंदिर, नांदगाव माध्यमिक विद्यालय सावरगाव, किसान माध्यमिक विद्यालय वाखारी, सरस्वती विद्यामंदिर मनमाड या शाळांमधील २५७५ विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य आणि सायन्स कॉलेजच्या मैदानावर सामुहिक सूर्यनमस्कार घालून एक नवीन जागतिक कीर्तिमान स्थापित केला.या सोहळ्यास हृदयरोग तज्ञ डॉ.अनिरु द्ध धर्माधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वत: व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.वैभव पाटील, नाशिक यांनी स्वत: विद्यार्थ्यांसमवेत प्रात्यक्षिक केले. त्यांनी आपल्या मनोगतात, आजच्या यांत्रिक युगात आजची पिढी व्यायामापासून दूर जात आहे. सरासरी आयुर्मान घटत चालले आहे.पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे असे सांगून त्यांनी अष्टांग योगाचे महत्व सांगितले.आजच्या पिढीने वाईट सवयी व व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.व योग्य आहारपद्धती विषयी माहिती दिली. व विद्यार्थ्यांना आरोग्याचा मंत्र दिला. अध्यक्षस्थानी नांदगाव संकुलाचे प्रमुख शशिकांत आंबेकर होते. प्रास्ताविक सूर्यनमस्कार संकुल प्रमुख विजय चव्हाण यांनी केले.या प्रसंगी ५० महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल धर्मेश यादव (शौर्यचक्र विजेते ) ,नगराध्यक्ष राजेश कवडे,तहसीलदार चंद्रकांत देवगुणे ,पोलिस निरीक्षक बशीर शेख,संस्थेचे कार्यकारणी सदस्य संजीव धामणे,टी.एम. बोर्ड अध्यक्ष भैयासाहेब चव्हाण, कला,वाणज्यि आण िविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. पटेलहे उपस्थित होते. वर्ल्ड रेकोर्ड आॅफ इंडियाचे अधिकारी उमेश गायधनी यांच्या उपस्थितीत वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना व शाळेच्या प्रमुखांना देण्यात आले.संकल्पपूर्ती सोहळ्याचे शानदार उद्घाटन सर्व प्रमुख अतिथी व सर्व शाळांतील शालेयामतिी अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,माजी शिक्षक, पालक,नागरिक,विद्यार्थी,माजी विद्यार्थी उपस्थित होते. नियोजन सूर्यनमस्कार संकुल प्रमुख विजय चव्हाण,सहप्रमुख राहुल चिखले,प्रात्यक्षिक प्रमुख वाल्मिक जाधव,सुनिता देवरे यांनी केले.सुत्रसंचलन कु.वृषाली गढरी यांनी केले तर आभार जयंत निकम यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक