मिळकत विक्रीला बोलठाणकरांचा विरोध

By Admin | Updated: August 8, 2014 00:53 IST2014-08-07T21:57:30+5:302014-08-08T00:53:59+5:30

मिळकत विक्रीला बोलठाणकरांचा विरोध

Resistance to Income Tax Sales | मिळकत विक्रीला बोलठाणकरांचा विरोध

मिळकत विक्रीला बोलठाणकरांचा विरोध

 

नांदगाव : बोलठाण उपबाजार समितीची मिळकत विक्री करण्याच्या प्रक्रियेला बोलठाणकरांनी तीव्र विरोध केला असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची सदर जमीन असून, बाजार समितीनेच ती विक्रीला काढली आहे.
गट नं. ३४, क्षेत्र २ हेक्टर व २ आर आहे. जमिनीवर दोन गुदामे व लिलावासाठी मोठे शेड उभारण्यात आले होते. १९६०मध्ये बाजार समितीचे तत्कालीन अध्यक्ष यादव चव्हाण व माजी आमदार कै. कन्हैयालाल नहार यांच्या प्रयत्नांमधून बोलठाण येथे नांदगाव बाजार समितीची उपबाजार समिती निर्माण झाली होती. परंतु ती काही कारणास्तव बंद पडली. सद्यस्थितीत येथे शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार अनेक वर्षांपासून होत नाहीत. बाजार समितीचे माजी उपसभापती राजेंद्र नहार यांनी ते सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पण ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे जागेचा वापर होऊ शकला नाही. बोलठाण गाव घाटमाथ्यावरचे व्यापारी गाव असून, येथील बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. आजूबाजूच्या ग्रामीण भागात शेत-मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असते. येथील उपबाजार कार्यान्वित केला, तर शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरेल, असा नहार यांचा दावा आहे.

Web Title: Resistance to Income Tax Sales