हरी भक्ती धामच्या रहिवाश्याचाही गरजूंना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:59 IST2020-04-10T17:58:47+5:302020-04-10T17:59:36+5:30

नाशिक : कोरोनाच्या विषाणू पासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व स्तरातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्याकरिता हरी भक्ती धाम सोसायटीच्या रिहवाश्यानी धान्य व किरणामालाची व्यवस्था केली.

A resident of Hari Bhakti Dham also offers a helping hand to the needy | हरी भक्ती धामच्या रहिवाश्याचाही गरजूंना मदतीचा हात

हरी भक्ती धामच्या रहिवाश्याचाही गरजूंना मदतीचा हात

ठळक मुद्देअनुभव शिक्षा केंद्र या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत पोहोचिवले.

नाशिक : कोरोनाच्या विषाणू पासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व स्तरातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्याकरिता हरी भक्ती धाम सोसायटीच्या रिहवाश्यानी धान्य व किरणामालाची व्यवस्था केली.
गेल्या दोन आठवड्याहून अधिक दिवसांपासून राज्यात कोरोनापासून बचाव करण्याकरिता संचारबंदी लागू केली आहे, परिणामी अनेकांचे रोजगार बुडाले, हातावर पोट असल्याचे जगणे कठीण झाले आहे. शिवाय गोर गरिबांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत असल्याने दिपाली नगर येथील हरी भक्ती धाम सोसायटीतील रिहवास्यानी यथाशक्ती पैसे गोळाकरून मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ, डाळी, तेल, तिखट, मीठ आदी आवश्यक वस्तू विकत आणल्या व त्या येथील अनुभव शिक्षा केंद्र या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत पोहोचिवले.
या करिता सोसायटीतील परशुराम राऊत, दत्तात्रय जाधव, हरीचंद्र अिहरराव, अरु ण सूर्यवंशी, पवनकुमार शर्मा, निषाद जोशी, मुग्धा कुलकर्णी, निखिल जोशी, दत्ता राऊत, वृषाली जोशी, विशाखा जाधव, विद्या कुलकर्णी, प्रशांत गोसावी आदींनी परिश्रम घेतले.
(फोटो १० हरिभक्ती)

Web Title: A resident of Hari Bhakti Dham also offers a helping hand to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.