शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

धरणातील जलसाठा दहा टक्के घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:34 IST

उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही घट सुरू झाली असून, आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ४६ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. 

नाशिक : उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही घट सुरू झाली असून, आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ४६ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.  आगामी काळात उन्हाचे प्रमाण यापेक्षाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ते पाहता पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पाऊस लांबणीवरही परिणाम होत असल्याचे हवामान खात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर जिल्ह्णातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्णात पाणी सोडावे लागले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्णातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येऊन त्यानुसार आवर्तने सोडली जात असून, आजअखेर ४८००४ दशलक्ष घनफूट म्हणजेच ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ६५ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ६९ टक्के पाणी आहे. कश्यपी धरणात ९३, तर आळंदीत ६१ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समूहातून परजिल्ह्णाचे आवर्तन सोडण्यात आल्याने ३८ टक्केच पाणी शिल्लक आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत निम्म्याने पाणीसाठा घटला आहे. त्यात पालखेड धरणात फक्त नऊ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६४ टक्के पाणी आहे. गिरणा खोºयातील चणकापूरमध्ये ६० टक्के, तर हरणबारीत ३४ टक्के व गिरणात २८ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे, यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षांनंतर पूर्णपणे भरले होते. या धरणातील ८० टक्के पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यांत करण्यात आला आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण