राखीव सरपंचांना खासगी सचिव नेमावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:02+5:302021-09-02T04:29:02+5:30

बहुतेक ठिकाणी कमी शिकलेल्या महिलांच्या हाती पद दिल्यामुळे कुटुंबातील पुरुष अथवा गावातील राजकीय मंडळी परिस्थितीचा गैरफायदा घेतात व विकासाला ...

Reserve Sarpanch should be appointed as Private Secretary | राखीव सरपंचांना खासगी सचिव नेमावा

राखीव सरपंचांना खासगी सचिव नेमावा

बहुतेक ठिकाणी कमी शिकलेल्या महिलांच्या हाती पद दिल्यामुळे कुटुंबातील पुरुष अथवा गावातील राजकीय मंडळी परिस्थितीचा गैरफायदा घेतात व विकासाला खीळ बसविण्याचा उद्योग करतात.

सिन्नर शहरातून दुचाकीची चोरी

सिन्नर : शहरातील सूर्योदय संकुलसमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची घटना घडली. सुनील सुरेश येवलेकर (४०, रा. कानडी मळा) हे आपली हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी (क्र. एमएच १५ इव्ही २०५०) गावठा परिसरातील सूर्योदय संकुलसमोर लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी ते परत आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी सिन्नर पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी पुढील तपास करत आहेत.

निमगाव - सिन्नर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सिन्नर : तालुक्यातील निमगाव - सिन्नर येथील रोकडेश्वर क्लासमेट मित्र परिवाराच्यावतीने गुणवंत विद्यार्थी व कोरोना योध्द्यांचा सत्कार करण्यात आला. निमगाव सिन्नर येथील शिष्यवृत्तीपात्र झालेल्या व कोरोनाकाळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या कोरोना योध्द्यांचा गुणगौरव व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. किरण सानप, डॉ. अशोक सानप, आशासेविका निर्मला आव्हाड, संगीता सानप, श्वेता सानप, श्रावण घोलप, अविक्षीत सानप, कावेरी सानप, सौरभ घोलप यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपळेला डुबेरेतील नव्या रस्त्याने जोडण्याची मागणी

सिन्नर : डुबेरे येथे ढोली मळा भागातून समृध्दी महामार्गाच्या कामासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. पिंपळे गावाला डुबेरेतील नवीन रस्त्याने जोडल्यास अंतर व वेळेची बचत होऊ शकेल. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी पिंपळेचे सरपंच संपत बिन्नर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. पिंपळे ते सिन्नर हे अंतर अंदाजे पंधरा किलोमीटर आहे. सिन्नरहून पिंपळे येथे येण्यासाठी डोंगरांना वळसा घालून यावे लागते. सध्या डुबेरे येथे ढोली मळा भागातून ब्राह्मणदरा डोंगराजवळून समृद्धी महामार्गासाठी दगड, माती, मुरूम घेण्यासाठी डोंगराच्या कडेने रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्याने पुढे दक्षिण बाजुला तीन किलोमीटर गेल्यास पिंपळे गाव लागते. पिंपळे गावापर्यंत हा रस्ता जोडण्यात यावा तसेच या रस्त्याला जिल्हा परिषदेने मंजुरी दिल्यास फायदा होऊ शकतो.

Web Title: Reserve Sarpanch should be appointed as Private Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.