शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राखीव पोलीस दल दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:58 IST

लोकशाहीचा उत्सव सोमवारी (दि.२१) राज्यात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात सर्वत्र निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात आयुक्तालय हद्दीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) ४ तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) २ कंपन्यांचे मिळून सुमारे ६०० जवान दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देचोख सुरक्षा व्यवस्था : मतदानप्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी सज्ज

नाशिक : लोकशाहीचा उत्सव सोमवारी (दि.२१) राज्यात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात सर्वत्र निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात आयुक्तालय हद्दीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) ४ तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) २ कंपन्यांचे मिळून सुमारे ६०० जवान दाखल झाले आहेत. शहरातील सर्व मतदान केंद्रांसह स्ट्रॉँगरूमवरदेखील चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे.शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रे आहेत. या केंद्रांवरील सुमारे १ हजार १५४ बूथवर नाशिककर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. सर्व बूथनिहाय पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपविली गेली आहे. त्यानुसार सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंदोबस्त तैनात करत आहेत. शहरात सर्वच केंद्रांवर मतदानप्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. सर्वाधिक संवेदनशील केंद्रे भद्रकाली व पंचवटी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असून, या भागात पोलिसांकडून सशस्त्र पोलीस जवानांसह दंगल नियंत्रण पथकाचे जवानही तैनात करण्यात येणार आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) जवान निवडणूक बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाले आहेत. तसेच यासोबत गुजरात एसएपीच्या दोन कंपन्याही दिमतीला बोलविण्यात आल्याआहेत.असा असेल बंदोबस्त...२५४ इमारतींमधील केंद्रांच्या १ हजार १५४ बूथवर ७३५ पोलीस शिपाई, ५७७ होमगार्ड बंदोबस्तावर राहणार आहेत. याव्यतिरिक्त निवडणूक काळात व प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सहा उपआयुक्त, १९ सहायक आयुक्त, ७० पोलीस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, १९८ पुरुष शिपाई, सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई ३ हजार, होमगार्ड ७०० असा चोख बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकPoliceपोलिस