शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

नाशिक जिल्हा बॅँक बरखास्तीचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 6:26 PM

बॅँकेचे माजी संचालक व विद्यमान भाजपाचे आमदार डॉ. अपुर्व हिरे यांनी या संदर्भात सहकारमंत्र्यांना लेखी प्रश्नाद्वारे माहिती विचारली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची

ठळक मुद्देसुभाष देशमुख : विधीमंडळ अधिवेशनात सरकारची माहितीबरखास्तीची टांगती तलवार कायम

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या एकूणच कारभाराबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने त्याच बरोबर नाबार्डने केलेल्या आर्थिक निरीक्षक अहवालाच्या आधारे बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय नेमण्याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे सादर करण्यात आलायाची माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिली आहे. विशेष म्हणजे जिल्हा बॅँकेची सुत्रे भाजपाच्या ताब्यात गेली असली तरी, बरखास्तीची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.बॅँकेचे माजी संचालक व विद्यमान भाजपाचे आमदार डॉ. अपुर्व हिरे यांनी या संदर्भात सहकारमंत्र्यांना लेखी प्रश्नाद्वारे माहिती विचारली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असणे, खातेदारांच्या खात्यांवर शिल्लक असूनही त्यांना पैसे परत न मिळणे, बॅँकेच्या धनादेशा क्लेअरिंगचा परवाना रद्द झालेला असताना बॅँकेने अनावश्यक नोकर भरती केली आहे. त्यामुळे सभासद, खातेदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी सहकार खात्याने काय चौकशी केली असा प्रश्नही विचारला होता. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेल्या लेखी उत्तरात बॅँकेने १६ सेवकांची रोजंदारीवर नेमणूक केल्याचे मान्य केले असून, सहकार खात्याने सुरू केलेल्या चौकशीत कलम ८३ अन्वये नियुक्त प्राधिकृत अधिकाºयांनी जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नुकसानीस बॅँकेच्या संचालक मंडळास दोषी ठरविल्याने कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने बॅँकेची चौकशी सुरू असून, रोजंदारीवर नियुक्त केलेल्या १६ सेवकांना तात्काळ कमी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बॅँकेने विभागीय सहनिबंधकांकडे पुर्नविचार करण्याची विनंती करण्यात आली परंतु ती फेटाळण्यात आली आहे. नाबार्डच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या निरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने बॅँकेने आक्षेपांची पुर्तता केली नाही. सबब बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बॅँकेवर प्रशासक नियुक्ती करण्याचा प्रस्ताव १२ जुलै रोजीच रिझर्व्ह बॅँकेकडे सादर करण्यात आला असून, अद्याप रिझर्व्ह बॅँकेने त्यास मंजुरी दिलेली नाही असे म्हटले आहे.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक