मराठा समाजालाही मिळावे आरक्षण

By Admin | Updated: September 19, 2016 00:17 IST2016-09-19T00:16:39+5:302016-09-19T00:17:08+5:30

महादेव जानकर : तरुणांना प्रगती साधण्याचे आवाहन

Reservation for Maratha Community | मराठा समाजालाही मिळावे आरक्षण

मराठा समाजालाही मिळावे आरक्षण

नाशिक : त्या - त्या जातीच्या आरक्षणाप्रमाणेच मराठा समाजालादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली स्वत:ची भूमिका आहे. मराठा समाजाच्या आणि तरुणांच्या प्रगतीसाठी मराठा तरुणांनी आपण उद्योजक कसे होऊ याचादेखील विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आलेल्या महादेव जानकर यांनी आरक्षणाविषयीची आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. ज्या त्या समाजाचे सामाजिक आरक्षण त्यांना मिळालेच पाहिजे याचा अर्थ एकाचे काढून दुसऱ्याला आरक्षण मिळावे, असा होत नाही. मराठा समाजाच्या तरुणांनीदेखील आरक्षणाची मागणी करण्याबरोबरच आपण उद्योजक कसे होऊ तसेच स्पर्धा परीक्षांमधून आयएएस, आयपीएस होण्याचाही विचार करून प्रगती साधली पाहिजे, असेही आवाहन जानकर यांनी केले. (प्रतिनिधी)गुन्हेगाराला जातीशी जोडू नये कोपर्डी प्रकरण निश्चितच अन्यायकारक आहे. खरेतर गुन्हेगाराला कोणतीही जात नसते, त्यांना जातीशी जोडता कामा नये, मात्र गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. मराठा समाजाचे मोर्चे हे दलितांच्या विरोधातील नाहीत. फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा महाराष्ट्राला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वरांची ही भूमी आहे. त्यामुळे कुठेही या मोर्चांवरून गैरसमज होणार नाहीत, जर कुणी याप्रकरणी विष कालवायचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यास शासन सक्षम आहे, असेही जानकर म्हणाले.

Web Title: Reservation for Maratha Community