मनमाड रेल्वेस्थानकावर आरक्षण काउण्टर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:47 IST2020-05-22T20:54:11+5:302020-05-22T23:47:08+5:30
मनमाड : येत्या १ तारखेपासून रेल्वेमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर आज एक आरक्षण काउण्टर सुरू करण्यात आले आहे.

मनमाड रेल्वेस्थानकावर आरक्षण काउण्टर सुरू
मनमाड : येत्या १ तारखेपासून रेल्वेमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर आज एक आरक्षण काउण्टर सुरू करण्यात आले आहे.
तब्बल दोन महिन्यांनंतर रेल्वे आरक्षण सुरू झाले असले तरी आरक्षणासाठी प्रवाशांची फारशी गर्दी दिसून आली नाही. संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर २५ मार्चपासून सर्वत्र रिझर्व्हेशन काउण्टर्स बंद करण्यात आले होते. १ जूनपासून सुरू होणाºया २०० ट्रेन्स आणि चालवल्या जाणाºया राजधानी गाड्यांची आरक्षित तिकिटं मिळण्याला आज सुरुवात झाली. रेल्वे परिपत्रकानुसार, प्रवासी आरक्षित प्रवासासाठी रेल्वेस्थानक परिसरातील काउण्टरवरून तिकिटे आरक्षित करू शकतील. तिकिटांचे आरक्षण करताना सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी प्रत्येक रेल्वे विभागाची असणार आहे. केवळ आरक्षण काउण्टर्स आजपासून सुरू झाले आहे. तिकीट कॅन्सलेशन रिफंड काउण्टर्स हे येत्या २५ तारखेपासून सुरू होणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.