शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वाघेरा घाटात जखमी गिधाड ‘रेस्क्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:47 AM

नाशिक-हरसूल दरम्यान वाघेरा घाटात अत्यवस्थेत एका डोंगराच्या पायथ्याशी लांब चोचीचे जखमी गिधाड पडलेले असल्याची माहिती काही आदिवासी नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर तत्काळ नाशिक येथून इको-एको फाउंडेशन वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी धाव घेत गिधाडाला सुरक्षित रेस्क्यू केले.

नाशिक : नाशिक-हरसूल दरम्यान वाघेरा घाटात अत्यवस्थेत एका डोंगराच्या पायथ्याशी लांब चोचीचे जखमी गिधाड पडलेले असल्याची माहिती काही आदिवासी नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर तत्काळ नाशिक येथून इको-एको फाउंडेशन वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी धाव घेत गिधाडाला सुरक्षित रेस्क्यू केले. वनविभागाच्या नाशिक पश्चिम कार्यालयात जखमी गिधाडावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली.लांब चोचीच्या प्रजातीमधील कमी वयाच्या एका गिधाडाचा अंदाज चुकल्याने झाडांच्या फांद्यावर किंवा डोंगराच्या कपारीवर आदळून जमिनीवर कोसळले. याबाबत वाघेरा घाटातील आदिवासी नागरिकांनी त्वरित वन विभागाला माहिती दिली. चिंचवड-नाकेपाडा येथून त्वरित त्र्यंबकेश्वर वनक्षेत्रपाल कार्यालयाला याबाबत माहिती समजली. त्यानंतर तत्काळ वन्यजीवप्रेमी वैभव भोगले, सागर पाटील, अभिजित वाघचौरे या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लांब चोचीचे अवघ्या काही महिन्यांचे गिधाड जवळपास बेशुद्धावस्थेत त्यांना आढळून आले. रक्तस्त्राव अधिक झाल्याने तसेच शरीरातील पाणी कमी होऊन गिधाडाची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याचे लक्षात येताच तत्काळ त्याला वनविभागाच्या वाहनातून नाशिकच्या अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. जखमेवर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले आहे, मात्र जखम गंभीर असल्यामुळे हे गिधाड पुन्हा आकाशात भरारी घेईल का? अशी भीती व्यक्त होत आहे. मागील दोन दिवसांपासून वन विभागाच्या कार्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी, हरसूल, बोरगड या भागांमध्ये गिधाडाचा आजही अधिवास आहे, हे शुभवर्तमान आहे. गिधाड संरक्षणासाठी वन विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ घोषित करण्याच्या हालचाली मंदावल्याचे चित्र आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग