करंजवणच्या पाणी आरक्षणासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 18:55 IST2018-01-10T18:54:54+5:302018-01-10T18:55:53+5:30
मनमाड : शासनाने प्रस्तावित केलेल्या करंजवण-मनमाड योजनेसाठी वर्षभर पाठपुरावा करूनही पालखेड पाटबंधारे विभागाने पाण्याच्या आरक्षणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने पाण्याचे आरक्षण आणि जलकुंभासाठी जमीन अधिग्रहित करावी, अशी मागणी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

करंजवणच्या पाणी आरक्षणासाठी निवेदन
मनमाड : शासनाने प्रस्तावित केलेल्या करंजवण-मनमाड योजनेसाठी वर्षभर पाठपुरावा करूनही पालखेड पाटबंधारे विभागाने पाण्याच्या आरक्षणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने पाण्याचे आरक्षण आणि जलकुंभासाठी जमीन अधिग्रहित करावी, अशी मागणी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वात गंभीर पाणीटंचाईग्रस्त मनमाड शहरासाठी करंजवण-मनमाड जलयोजना प्रस्तावित केलेली आहे. मनमाड बचाव कृती समितीने नगरपरिषदेकडे करंजवणच्या पाण्यासाठी आरक्षण मागण्याचा पाठपुरावा चालविलेला आहे. पालिका प्रशासनाने सातत्याने पालखेड पाटबंधारे विभागाकडे मागणीचा पाठपुरावा करूनदेखील पालखेड विभागाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. याबाबत शहरातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान पालिकेने करंजवणच्या पाण्यावर आणि तेथे उभारल्या जाणाºया जलकुंभाच्या जागेसाठी तातडीने आरक्षण मागावे अशा आशयाचे निवेदन मुख्य अधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांना दिले आहे. यावेळी मनमाड बचाव कृती समितीचे पुंडलिक कचरे, मनोज गांगुर्डे, उपाली परदेशी, रामदास पगारे, डी. एम. व्यवहारे, सुरेश वाघ, अशोक परदेशी आदी उपस्थित होते.