विविध संघटनांनी दिले पोलीस ठाण्यात निवेदन
By Admin | Updated: June 2, 2014 00:32 IST2014-06-01T23:31:41+5:302014-06-02T00:32:42+5:30
कारवाई करण्याची मागणी : महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर

विविध संघटनांनी दिले पोलीस ठाण्यात निवेदन
कारवाई करण्याची मागणी : महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर
पंचवटी : महाराष्ट्रातील थोर महापुरूषांच्या सोशल नेटवर्क साईटवर पोस्ट टाकून अवमानकारक मजकूर टाकणार्या समाजकंटकांवर कारवाई करावी यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कारवाईचे निवेदन दिले आहे.
काल फेसबुक या सोशल साईटवर समाजकंटकांनी महापुरूषांची अवमानकारक छायाचित्रे पोस्ट करून अवमानकारक मजकूर टाकला होता. या प्रकरणाची माहीती होताच पंचवटीतील विविध संघटनांनी तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या जमावाने पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिराने धाव घेऊन उपस्थित अधिकार्यांशी चर्चा करून संबंधित समाजकंटकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस अधिकार्यांना लेखी निवेदन दिले आहे. काल घडलेल्या या घटनेचा पंचवटीतील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. (वार्ताहर)