सुतार समाजाच्या मागण्यांबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:32 IST2018-09-25T01:31:54+5:302018-09-25T01:32:12+5:30

सुतार समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात अखिल महाराष्ट सुतार-लोहार संघाचे प्रदेश अध्यक्ष सुदाम खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त माने यांची भेट घेऊन त्यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले.

 Request to the Divisional Commissioner regarding the demands of the Sutar community | सुतार समाजाच्या मागण्यांबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन

सुतार समाजाच्या मागण्यांबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन

नाशिक : सुतार समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात अखिल महाराष्ट सुतार-लोहार संघाचे प्रदेश अध्यक्ष सुदाम खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त माने यांची भेट घेऊन त्यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांबाबत त्यांच्याशी सखोल चर्चा करण्यात आली.  सुतार समाजाला एनटीमध्ये घेण्यात यावे या कारागीर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित निवेदन त्वरित शासनाकडे कार्यवाहीसाठी पाठवू असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिले.  या प्रसंगी बाळासाहेब शिंदे, राजाभाऊ शिरसाठ, एम.टी. लुल्ले, प्रदेश सरचिटणीस नाना खैरनार, दिलीप पेंढारी, रमेश गाडेकर, रमेश आहेर, रमेश जाधव, केदा मोरे, देवीदास देवरे, बापू शिंदे, नंदू शिरसाट, पंकज खैरनार, नंदू भालेराव, सुरेश खैरनार, सुशील सोनवणे, आशुतोष गाडेकर, किरण व ललित सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे, दत्तात्रय खैरनार, आदींसह संघांचे जिल्हा व राज्य प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title:  Request to the Divisional Commissioner regarding the demands of the Sutar community