शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

उत्तर महाराष्ट्रामध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:24 IST

राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.

ठळक मुद्देलक्षवेधी लढती ; भाजप, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २८ उमेदवार

नाशिक : राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व नगर या पाच जिल्ह्यांतील ४७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सर्वाधिक प्रत्येकी २८ जागा भाजप व राष्ट्रवादीकडून लढविल्या जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नगर जिल्ह्यात काँग्रेस १२ पैकी तीन जागांवर लढत आहे. याच जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार व भाजपचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यात होत असलेल्या आणि नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात छगन भुजबळ नांदगावमधील त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या लढतीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. नाशकात भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापले गेल्याने ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यंदा इगतपुरीतून शिवसेनेच्या, तर भरत गावित नवापूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीस सामोरे जात आहेत. विशेष म्हणजे, नाशिक पश्चिमची जागा युतीअंतर्गत शिवसेनेला न सुटल्याने भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात सेनेचे बंडखोर विलास शिंदे रिंगणात असून, शिंदे यांच्या समर्थनार्थ नाशकातील शिवसेनेच्या सुमारे ३५० पदाधिकाऱ्यांसह ३४ नगरसेवकांनी पक्षप्रमुखांकडे राजीनामे पाठविल्याने सदर जागेवर मोठी चुरस दिसून येत आहे.एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत राहिलेले खान्देशातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे यंदा तिकीट कापले जाऊन त्यांच्या कन्येस रिंगणात उतरविले गेले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकDhuleधुळेJalgaonजळगावAhmednagarअहमदनगर