शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
'श्रीमंताच्या मुलाला निबंध अन् ट्रक चालकांना १० वर्षाची शिक्षा'; पुणे प्रकरणात राहुल गांधींचा सवाल
4
लहान असताना कंपनीत औषधं बनताना पाहिली, आज ७० देशांमध्ये व्यवसाय; नेटवर्थही ८८ हजार कोटींपेक्षा अधिक
5
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
6
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
7
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
8
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
9
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
10
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
11
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
12
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
13
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
14
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
15
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
16
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
17
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
18
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
19
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
20
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट

प्रजासत्ताकदिनी अश्लील गीतांवर धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 1:15 AM

प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको परिसरातील कामटवाडा भागात एका भोजपुरी मंडळाच्या वतीने आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील गीतांवर थिरकत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको परिसरातील कामटवाडा भागात एका भोजपुरी मंडळाच्या वतीने आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील गीतांवर थिरकत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कामटवाडेमधील डीजीपीनगर क्रमांक दोनच्या माउली लॉन्समध्ये भोजपुरी मंडळाच्या वतीने देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर पारंपरिक नृत्य सादरीकरणाऐवजी चक्क अश्लील नृत्याचा नजराणा सादर करण्यात आल्याने उपस्थितांनाही धक्का बसला. या कार्यक्रमाला विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवकमंडळी प्रेक्षकवर्गात उपस्थित होती. मंचावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकावर सर्व आयोजक समितीच्या पदाधिकाºयांची छायाचित्रेही चित्रीकरणातून झळकली. मंचावर तरुणींनी अश्लील प्रकारचे नृत्य के ले. या नृत्यावर काही प्रेक्षकांनी फिदा होऊन चक्क मंचावर जाऊन नोटाही उधळल्या; मात्र आयोजक समितीचे प्रमुख बी. एल. श्रीवास्तव यांनी या बाबीचे खंडण केले असून, असा कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचा दावाही केला आहे. भोजपुरी गीतांच्या चालीवर थिरकत तरुणींनी अश्लील नृत्य सादर केल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला असून, चक्क देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या नावाखाली सिडको परिसरात डान्सबार भरविला गेल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. मंचावर कला सादर करणाºया तरुणींनी चक्क अश्लील प्रकारचे नृत्य सादर केल्याचे व्हायरल झालेल्या चित्रफितीमधून दिसते.दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्टÑभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी विविध राजकीय नेते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात अशा कुठल्याही प्रकारे नोटांची उधळण झालेली नाही. कार्यक्रम भोजपुरी देशभक्तीपर गीतांचा होता.- बी. एल. श्रीवास्तव, आयोजक

टॅग्स :Nashikनाशिक