शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात; भारत मातेचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:06 IST

भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत प्रभातफेरी काढून विविध कार्यक्र मांनी परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिक : भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत प्रभातफेरी काढून विविध कार्यक्र मांनी परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  मनपा शाळा पाथर्डीगाव, मनपा शाळा प्रशांतनगर, तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, पाथर्डी फाटा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेवक तथा शिक्षण मंडळ सदस्य सुदाम डेमसे, नगरसेवक भगवान दोंदे, नगरसेवक संगीता जाधव, नगरसेवक पुष्पा आव्हाड, सोसायटीचे अध्यक्ष संजय डेमसे, चेतन चुंभळे, शिवसेना पक्ष पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक आबा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक रोहित शिंदे, विकास लोंढे, संदीप बोडके यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होतेज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ, संचलित डे केअर सेंटर शाळेत ध्वजारोहण डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. आप्पासाहेब उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव अ‍ॅड. अंजली पाटील, संचालक अनिल भंडारी, वसंतराव कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, छाया निखाडे, अ‍ॅड. मुग्धा सापटणेकर, मुख्याध्यापक शरद गीते, माधुरी मरवट, विद्या अहिरे, पूनम सोनवणे उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सूचितानगर मित्रमंडळाच्या वतीने इंदिरानगर जॉगिंग ट्रैक, भारत मातेचे पूजन व ध्वजारोहण सिटी गार्डनसमोर आले. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सरप्रित सिंग बल, सद्दाम शेख, प्रतीक मोटकरी, अश्विन देसले, सौरभ बविस्कर, कौशिक पाटील बिरारी, ऱफिक सय्यद हर्शल जाधव व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.सरस्वती पाटील विद्यालयसिडको येथील पाटीलनगरमधील श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात सकाळी संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष केशवराव पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश कोठावळे, बाळासाहेब लोंढे, राम पाटील, दीपिका पाटील, निवेदिता पाटील, श्याम पाटील, भरत पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी रंगीत कवायत सादर केली. त्यानंतर कार्यक्र माचे अध्यक्ष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. सूत्रसंचालन किरण शिरसाठयांनी केले. प्रास्ताविक गोलाईत यांनी केले. मुख्याध्यापक सुनील बिरारी यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक वाकचौरेंसह पालक उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिक