नाभिक समाजाच्या वतीने लासलगाव येथे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:46 IST2019-01-30T23:45:41+5:302019-01-30T23:46:36+5:30

लासलगाव : सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील बारावीची विद्यार्थिनी भाग्यश्री संतोष माने हिच्या हत्येचा लासलगावी निषेध व्यक्त करून नाभिक समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. 

Representation of the Nabhika community at Lasalgaon | नाभिक समाजाच्या वतीने लासलगाव येथे निवेदन

लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना निवेदन देताना नाभिक समाजबांधव.

ठळक मुद्देनाभिक समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.

लासलगाव : सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील बारावीची विद्यार्थिनी भाग्यश्री संतोष माने हिच्या हत्येचा लासलगावी
निषेध व्यक्त करून नाभिक समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात भाग्यश्रीच्या हत्येचा तपास लावून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी नाभिक समाजाचे अरविंद देसाई, अनिल वाघ, अशोक जाधव, राजेंद्र आंबेकर, संदीप वाघ, तुषार जगताप, रमेश वाघ, अभिजित जगताप, केशव देसाई, दत्ता वाघ, परेश जाधव, पंकज सुर्वे, मगन औटे, केशव बोराडे, नितीन वाघ, रवींद्र वाघ, शशिकांत महाले, अविनाश देसाई, भरत वाघ, मनीष देसाई, दत्ता निकम, संदिप कदम राजेंद्र वाघ यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Representation of the Nabhika community at Lasalgaon