निवेदन : अत्याचार पीडितांना न्याय मिळण्याची मागणी

By Admin | Updated: October 9, 2016 01:24 IST2016-10-09T01:22:38+5:302016-10-09T01:24:38+5:30

गोसावी समाजाचा मूक मोर्चा

Representation: The demand for justice for tortured victims | निवेदन : अत्याचार पीडितांना न्याय मिळण्याची मागणी

निवेदन : अत्याचार पीडितांना न्याय मिळण्याची मागणी

नाशिक : कोपर्डी, नाशिक व पाथर्डी येथील अत्याचाराच्या घटना मानवी हक्कांना बाधीत करणाऱ्या असून, पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील मूकबधिर मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केल्यास अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी संशयित आरोपीने दिली. या प्रकाराने मानवी संस्कृती आणि भारतीय घटनेला धक्का पोहोचविणारा प्रकार घडल्याचे सांगत मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ गोसावी समाजाने शनिवारी (दि.८) मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आधी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली.

Web Title: Representation: The demand for justice for tortured victims