कळवणला चिनी मालावर बहिष्कार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:00 IST2020-06-21T21:16:53+5:302020-06-22T00:00:10+5:30
कळवण : येथील तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिनी उत्पादनांची होळी करून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करून व्यापारीवर्गाने चिनी मालाची विक्री करू नये असे आवाहन करण्यात आले. गलवान खोऱ्यात चिनी सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कळवण बसस्थानकावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिनी मालाची होळी करून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन करताना पदाधिकारी व कार्यकर्ते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : येथील तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिनी उत्पादनांची होळी करून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करून व्यापारीवर्गाने चिनी मालाची विक्री करू नये असे आवाहन करण्यात आले. गलवान खोऱ्यात चिनी सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, विश्वास पाटील, शहराध्यक्ष निंबा पगार, सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, हेमंत रावले, चेतन निकम, उमेश पगार, एस. के. पगार, हितेंद्र पगार, प्रवीण रौंदळ, मिलिंद जुन्नरे, मोती वाघ, रुपेश शिरोडे, श्रीकांत कुलकर्णी, सोनाली जाधव, रत्ना जाधव, सचिन सोनवणे, काशीनाथ गुंजाळ, अमित परदेशी, सोनल ठाकरे, बाळू मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.