नाशिक : महापालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेली परिवहन सेवा आणि स्थायी समिती संदर्भातील अहवाल प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर यासंदर्भात काही तरी निर्णय प्राप्त होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना यासंदर्भात माहिती मागितली होती. कोणत्याही समितीच्या जागा रिक्त आहेत. त्या अनुषंघाने नाशिक महापालिकेस परिवहन कंपनी आणि स्थायी समितीसंदर्भातील माहिती मागितली होती. ही माहिती प्रशासनाने सादर केली आहे.महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महासभेत आधी परिवहन समिती तयार करण्याचा ठराव करण्यात आला होता. नंतर तो बदलून कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, त्याची माहिती शासनाला पाठविण्यात आलीआहे.आयुक्तांकडे घेतली धावमध्यंतरी स्थायी समितीचादेखील वाद निर्माण झाल होता. स्थायी समितीच्या एका सदस्यपदावर पक्षीय तौलनिक बळाच्या जोरावर शिवसेनेने दावा केला होता. यासंदर्भात शिवसेनेने विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. परंतु त्यांनी महापालिकेलाच यासंदर्भात अधिकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता हा विषय महापालिकेच्या कोर्टात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून, त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीअभावी स्थगित असल्याचे प्रशासनाने शासनाला कळविले आहे.
परिवहन सेवेचा अहवाल शासनाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:24 IST