आॅनलाइन बदलीप्रक्रियेतील गैरप्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:48 IST2019-01-06T00:45:13+5:302019-01-06T00:48:57+5:30

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक २०१७ पासून अनधिकृतरीत्या गैरहजर असताना २०१८मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत आॅनलाइन बदलीप्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करून गैरहजर शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीस मान्यता देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे नियम डावलून बदलीस मान्यता देणाºया तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी शनिवारी (दि. ५) दिले आहेत.

Replacing online repudiation of malpractices | आॅनलाइन बदलीप्रक्रियेतील गैरप्रकार उघड

आॅनलाइन बदलीप्रक्रियेतील गैरप्रकार उघड

ठळक मुद्देपदाचा गैरवापर : मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक २०१७ पासून अनधिकृतरीत्या गैरहजर असताना २०१८मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत आॅनलाइन बदलीप्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करून गैरहजर शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीस मान्यता देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे नियम डावलून बदलीस मान्यता देणाºया तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी शनिवारी (दि. ५) दिले आहेत.
इगतपुरीतील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बापू भिवसन पाटील हे शिक्षक मार्च २०१७ पासून ते अनधिकृतपणे गैरहजर असल्याने त्यांच्या विरोधात खातेचौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. बापू पाटील अनधिकृतपणे गैरहजर असल्याचा अहवाल गटशिक्षण अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांनीच सादर केला होता. असे असतानाही २०१८ मध्ये झालेल्या जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेत सदर शिक्षकाने पेहरेवाडी येथून विनंती बदलीबाबत आॅनलाइन माहिती भरून बदलीसाठी अर्ज केला होता. त्यांना मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी मान्यताही दिली.  त्यामुळे संबंधित शिक्षकाची कळवण तालुक्यातील आठंबे येथे बदली झाली. याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापक यांनी पदाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिक री डॉ. नरेश गिते यांनी संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Replacing online repudiation of malpractices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.