थविल यांची बदली; नाईक यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 01:04 IST2020-08-17T01:04:39+5:302020-08-17T01:04:59+5:30

स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Replacement of Thavil; Appointment of Naik | थविल यांची बदली; नाईक यांची नियुक्ती

थविल यांची बदली; नाईक यांची नियुक्ती

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची २०१६ स्थापना करण्यात आल्यानंतर महसूल विभागाचे प्रकाश थविल यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. मुदत संपल्यानंतरही त्यांची बदली न झाल्याने काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती.
तीन वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम आणि त्यानंतर ठेकेदाराला प्रतिदिन ३६ हजार रुपये दंड केल्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यापासून हा दंड रद्द करण्याचा वादग्रस्त निर्णय थविल यांच्या अंगाशी आला होता. शुक्रवारी झालेल्या महासभेत याप्रकरणी कंपनीकडे खुलासा मागण्याचे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले होते. गोदावरी नदीचे कॉँक्रिटीकरण करणे- काढणे हे प्रोजेक्ट कामदेखील वादग्रस्त ठरले.

Web Title: Replacement of Thavil; Appointment of Naik