दारणाचे आवर्तन, प्रशासनाचे मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:26 IST2019-04-12T00:23:00+5:302019-04-12T00:26:58+5:30
सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे.

दारणाचे आवर्तन, प्रशासनाचे मौन
सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे. येत्या आठ दिवसात दारणा नदीपात्रात पाण्याचे आर्वतन न सुटल्यास कधी नव्हे एवढ्या पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ सिन्नरकरांसह टॅँकरने पाणीपुरवठा होणाºया गावांवर येणार आहे.
सिन्नर शहरास दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातून पाणीपुरवठा होत असतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून नदीपात्र कोरडे पडल्याने इंटेक विहिरीत पाणी येत नाही. त्यामुळे नदीपात्रात खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी विद्युत जलपंप टाकून ते एका मोठ्या खड्ड्यात जमा करून त्याचा उपसा करण्याची वेळ नगर परिषदेवर आली आहे. जवळच्या खड्ड्यातील पाणी एकत्र करून उपसा करत जास्तीत जास्त सात दिवस पाणी पुरेल इतकेच पाणी नदीपात्रात आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे. जी अवस्था नगर परिषदेची आहे तीच अवस्था एमआयडीसी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे. दारणा नदीपात्रातून सिन्नर नगर परिषदेसह एमआयडीसी, भगूर नगर परिषद, देवळाली कॅम्प व नाशिकरोडच्या काही भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाचही जणांनी दारणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पाणीसाठा लवकर संपल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. नियोजित आवर्तन मे महिन्यात असताना एप्रिलमध्येच पाणी संपल्याने अवैध पाणी उपशाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला.सिन्नर शहराला केवळ सात दिवस पाणी पुरेल इतके पाणी कसेबसे उपलब्ध केले जात आहे. आवर्तन न सुटल्यास टंचाई वाढणार आहे. खासगी टॅँकरचालकांची बैठक घेऊन कोणत्या विहिरींतून पाणी उपलब्ध करून घेता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. दारणा धरणातच कमी साठा असल्याने आवर्तन सुटत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन आहे. सिन्नरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह सहकार्य करावे.
-व्यंकटेश दूर्वास, मुख्याधिकारी, सिन्नर