विलहोळी- चुंचले रस्त्याची लोकवर्गणीतून दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:09 IST2020-10-01T23:53:37+5:302020-10-02T01:09:53+5:30
सिडको : विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजने दरम्यान असलेल्यादोन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आमदार निधीसह लोकवर्गणीतून रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

विलहोळी- चुंचले रस्त्याची लोकवर्गणीतून दुरुस्ती
सिडको : विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजने दरम्यान असलेल्यादोन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आमदार निधीसह लोकवर्गणीतून रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
चुंचाले घरकुल लगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले असून, विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजना या दरम्यान दोन किलोमीटरचा मातीचा रस्ता हा खराब असल्याने येथून ये - जा करणे मुश्किल झाले आहे. यातच पावसामुळे ठीकठिकाणी खड्डे पडले असून यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. याबाबत आमदार अहिरे यांनी रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती करण्यासाठी एक समिती नेमण्याचे ठरवले असून तातडीने त्यावर कारवाई करण्यात आली. त्यासोबतच या रस्त्याच्या कामांसाठी दहा लाख रुपये आमदार निधी देण्याचे घोषणा अहेर यांनी केली. तसेच याविषयी एक समिती तयार करून त्याद्वारे निधीची उपलब्धता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार अनिल दौंडे, मंडळ अधिकारी पाथर्डी जयंत लिलके, जिल्हा परिषद अभियंता एन. आर. पाटील, सेक्शन इंजिनिअर एच. के. चौधरी,माजी सरपंच विल्होळी बाजीराव गायकवाड, उद्योजक संजय झा,मोतीराम भावनाथ रंजीत पाटील आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.