देवळा-खर्डे रस्त्यावरील खड्ड्याची दुरु स्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:25 IST2020-06-16T21:26:57+5:302020-06-17T00:25:29+5:30

खर्डे : येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील देवळा - खर्डे रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन खड्डा बुजविल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Repair of pothole on Deola-Kharde road | देवळा-खर्डे रस्त्यावरील खड्ड्याची दुरु स्ती

देवळा-खर्डे रस्त्यावरील खड्ड्याची दुरु स्ती

खर्डे : येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील देवळा - खर्डे रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन खड्डा बुजविल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. देवळा-खर्डे रस्त्यावरील प्रशासकीय इमारती समोरील रस्त्यावर गेल्या अनके दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याची बातमी शनिवारी (दि. १३) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या खड्ड्यात वाहने आदळून रोजच अपघात होत होते. यामुळे वाहनांचे नुकसानीसह शारीरिक त्रास चालकाला सहन करावा लागत असे. आता समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Repair of pothole on Deola-Kharde road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक