सिन्नरच्या रेणुकानगर भागात सहाजणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:05 IST2020-06-24T16:04:56+5:302020-06-24T16:05:16+5:30
सिन्नर: शहरातील रेणुकानगर भागातील एकाच कुटुंबातील सहा जण कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यापूर्वी सापडलेल्या रुग्णाच्या निकट ...

सिन्नरच्या रेणुकानगर भागात सहाजणांना कोरोनाची बाधा
सिन्नर: शहरातील रेणुकानगर भागातील एकाच कुटुंबातील सहा जण कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यापूर्वी सापडलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील हे सर्व सहाजण बाधीत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी दिली.
२२ जून रोजी रेणुकानगर भागातील ५९ वर्षीय पुरुष कोरोना बाधीत आढळून आला होता. त्यांच्या निकट संपर्कातील आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी सहा जण कोरोना बाधीत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यात पूर्वीच्या रुग्णाची ७९ वर्षीय आई, ५६ वर्षीय पत्नी, ३५ वर्षाचा मुलगा, ३२ वर्षीय सून, चार वर्षाची नात व सात वर्षाचा नातू असे कोरोना बाधीत आढळून आले आहेत.