नाशिक : रविवार कारंजावरील सुंदर नारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम अखेरीस सुरू झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे काही दिवस हे काम थांबले होते, मात्र शंका निरसन झाल्यानंतर पुन्हा ते सुरू झाले.अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिर हे पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित करण्यात आले आहे. त्याच्या नूतनीकरणाचे काम विशिष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. दक्षिणेतील कारागीर आणून दगड घडवले जात आहेत. मंदिराचे सर्वच दगड बदलावेत अशी परिसरातील नागरिकांची मागणी होती. मात्र सर्व दगड बदलण्याची गरज नसल्याने संबंधित ठेकेदाराचे म्हणणे होते. त्यातून या कामात काळेबेर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. नगरसेवक शाहू खैरे यांच्याकडे यासंदर्भात वाद गेल्यानंतर हे काम थांबविण्यात आले होते. मात्र नंतर पुरातत्त्व खात्याचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदाराने शास्त्रोक्त कामाची पद्धत समजावून सांगितल्यानंतर संबंधितांचा विरोध मावळला आणि काम पूर्ववत सुरू झाले.
सुंदर नारायण मंदिराचे नूतनीकरण काम पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:26 IST
रविवार कारंजावरील सुंदर नारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम अखेरीस सुरू झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे काही दिवस हे काम थांबले होते, मात्र शंका निरसन झाल्यानंतर पुन्हा ते सुरू झाले.
सुंदर नारायण मंदिराचे नूतनीकरण काम पुन्हा सुरू
ठळक मुद्देविरोध मावळला : ‘पुरातत्त्व’चे शंका निरसन