राजापूर येथे राम मंदिराचा जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:33 IST2020-10-30T21:32:18+5:302020-10-31T00:33:01+5:30

राजापूर : येथील पुरातन राममंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.

Renovation of Ram Temple at Rajapur | राजापूर येथे राम मंदिराचा जीर्णोद्धार

राजापूर येथे राम मंदिराचा जीर्णोद्धार

राजापूर : येथील पुरातन राममंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पुरातन राममंदिरातील राम, लक्ष्मण, सीता यांच्या असलेल्या मूर्तीही जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे गावकर्‍यांनी जीर्णोद्धाराबरोबरच मंदिरातील जीर्ण झालेल्या मूर्ती बदलाण्याचा संकल्प केला. यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात आली. रमेश नागरे, शंकर मगर, समाधान आव्हाड, लक्ष्मण घुगे, नवनाथ सोनवणे यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून नवीन मूर्ती बसवण्यात आल्या. पोपट वाघ यांच्या हस्ते सपत्नीक पूजा केली गेली. पुरोहित वैभव जोशी, महेश जोशी वैजापूरकर यांनी धार्मिक विधी पूजा केल्या. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास काशीनाथ दराडे, रामभाऊ केदार, रमेश वाघ, दत्तू नाना दराडे, भीमराव भोरकडे, सुभाष वाघ, संजय कासार, सुनील सोनवणे, भाऊसाहेब बैरागी, पुंडलिक चव्हाण, आनंद गरुड, राजेंद्र वाघ, रवि इप्पर, सोमनाथ सोनवणे, अनिल अलगट, नवनाथ सोनवणे, दत्तू वाघ, भगवान बैरागी, पुरुषोत्तम बैरागी, सचिन बैरागी, साहेबराव वाघ आदी उपस्थित होते.

Web Title: Renovation of Ram Temple at Rajapur

टॅग्स :Nashikनाशिक